एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 4 डिसेंबर रोजी सहा वाजण्याच्या सुमारास लिंब तालुका सातारा येथे नितीन सर्जेराव सावंत वय 40 रा. लिंब, ता. सातारा यांना तेथीलच शुभम शंकर सावंत, रत्नदीप राजेंद्र सावंत, ऋषभ शंकर सावंत, महेश राजेंद्र सावंत यांनी जुन्या वादाचा राग मनात धरून मारहाण केली आहे. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली असून सहाय्यक फौजदार बागवान अधिक तपास करीत आहेत.


