maharashtra

अपघातात जखमी झालेल्या एकाचा मृत्यू


अपघातात जखमी झालेल्या एकाचा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

सातारा : अपघातात जखमी झालेल्या एकाचा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अशोक हणमंत राजेभोसले, वय ५५, रा. विसावा कॅम्प, सातारा हे अपघातात जखमी झाले होते. त्यांच्यावर सातारा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा दि. ६ रोजी मृत्यू झाल्याची खबर डॉ. ज्ञानेश्वर धुमाळ यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली.