गोळीबार मैदान जि.प शाळेच्या सुसज्ज इमारतीसाठी ना हरकत प्रमाणपत्र सादर करा : खा. उदयनराजेंची मागणी
गोळीबार मैदान येथील जि.प शाळेची सुसज्ज इमारत बांधण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे, अशी शिफारस खा.श्री.छ उदयनराजे भोसले व संग्राम बर्गे यांनी पोलिस अधीक्षक समीर शेख यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली.
सातारा : गोळीबार मैदान येथील जि.प शाळेची सुसज्ज इमारत बांधण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे, अशी शिफारस खा.श्री.छ उदयनराजे भोसले व संग्राम बर्गे यांनी पोलिस अधीक्षक समीर शेख यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली.
गोळीबार मैदान येथील जि.प शाळेची इमारत अत्यंत जीर्ण झाली आहे. या शाळेच्या नूतन इमारतीसाठी संग्राम बर्गे यांनी परिसरातील नागरिकांसह यापूर्वी पोलीस प्रमुखांची भेट घेऊन ना हरकत प्रमाणपत्रासाठी वारंवार पाठपुरावा केला आहे. या शाळेत गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत असून, या जीर्ण इमारतीमुळे घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा परिषद प्राथमिक हि शाळा पोलीस वसाहत हद्दीमध्ये आहे. सध्या त्या शाळेची इमारत धोकादायक झाली आहे. इमारत नवीन बांधणे आवश्यक आहे. इमारत खूप जुनी झाली असल्याने धोकादायक बनली आहे. त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या शाळेमध्ये गोळीबार मैदान व विलासपूर भागातील गरीब कुटुंबातील विध्यार्थी शिक्षण घेत आहेत. सदर शाळेची जागा पोलिस दलाच्या मालकीची असल्याने सदर जागेवर शाळेची नवीन इमारत बांधण्यासाठी आपल्या पोलीस खात्याचे ना हरकत प्रमाणपत्राची जिल्हा परिषदेस आवश्यकता आहे. शाळेची सुसज्ज इमारत बांधण्यासाठी आपण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे, अशी शिफारस खा.श्री.छ उदयनराजे भोसले व संग्राम बर्गे यांनी पोलिस अधीक्षक समीर शेख यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली. यावेळी खा.श्री.छ उदयनराजे भोसले मित्र समूह विलासपूर व गोळीबार मैदानचे पदाधिकारी उपस्थित होते.


