maharashtra

एसटी स्टॅन्ड परिसरातून महिलेचे सुमारे तीन लाखांचे दागिने लंपास


सातारा एसटी स्टॅन्ड परिसरातून एका महिलेचे सुमारे तीन लाखांचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सातारा : सातारा एसटी स्टॅन्ड परिसरातून एका महिलेचे सुमारे तीन लाखांचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा एसटी स्टॅन्डमध्ये अज्ञात चोरट्याने बॅगची चेन तोडून 3 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. ही घटना दि. 14 नोव्हेबर रोजी घडली. अज्ञात चोरट्याने बॅगमधील सव्वातीन तोळे वजनाचे मंगळसूत्र, तीन तोळ्याचा राणीहार, एक तोळ्याचा नेकलेस असा ऐवज चोरी केला. याप्रकरणी वैशाली मारुती कदम (वय 41, रा. मुंबई) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.