दोघांना मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : दोघांना मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 1 मार्च रोजी संध्याकाळी सहा वा. सुमारास वैभव सुभाष बांदल रा. अमृतवाडी, पाचवड, ता. वाई हे त्यांच्या घरात झोपलेले असताना तेथीलच रमेश भरत निकम विशाल रमेश निकम दत्तात्रय बाबुराव निकम तुषार दत्तात्रय निकम यांनी घरात येऊन शिवीगाळ करीत बांदल यांच्यासह त्यांच्या आईला लाथा बुक्क्यांनी, लाकडी काठीने तसेच लोखंडी गजाने मारहाण केली. याबाबतची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार भोसले करीत आहेत.


