विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी तिघांवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी तिघांवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 10 ऑगस्ट 2022 ते 26 ऑक्टोबर 2022 दरम्यान ऐश्वर्या रणजीत जाधव या विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पती रणजीत राजेंद्र जाधव, सासरे राजेंद्र गणपत जाधव आणि सासू संगीता राजेंद्र जाधव सर्व रा. वडूज, तालुका खटाव यांच्यावर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार महाडिक करीत आहेत.


