maharashtra

जिल्ह्यात दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दोघे जखमी


Two persons were injured in a two-wheeler accident in the district
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाल्याची घटना घडली.

सातारा : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शंकर मारुती यादव, वय ५५, रा. मराठवाडी, दिवशी, ता.  पाटण हे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात जखमी झाले. अन्य एका घटनेमध्ये शशिकांत वामन जाधव, वय ४१, रा. साठेवाडी, ता. कोरेगाव हे साठेवाडी येथे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात जखमी झाले. दोघांवर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.