गोडोली, ता. सातारा येथील डोंगरामध्ये विषारी औषध प्राशन केलेल्या एकाचा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली.
सातारा : गोडोली, ता. सातारा येथील डोंगरामध्ये विषारी औषध प्राशन केलेल्या एकाचा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १६ एप्रिल रोजी हिरालाल नामदेव पवार, वय ४८, रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर यांनी गोडोली येथील डोंगरामध्ये विषारी औषध प्राशन केल्याने त्यांना येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याची खबर सातारा शहर पोलीस ठाण्यात डॉक्टर अनिकेत ढापरे यांनी यांनी दिली आहे.


