सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी महिलेवर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी महिलेवर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता लोणंद तालुका खंडाळा गावच्या हाती एचपी पेट्रोल पंपा समोर असणाऱ्या सुरभी ढाबा येथे वैशाली महेश पवार राहणार लोणंद तालुका खंडाळा ही महिला दारू पिऊन गोंधळ घालीत गैरवर्तन करताना आढळून आली. या प्रकरणी तिच्यावर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास महिला पोलीस नाईक गलंडे करीत आहेत.


