maharashtra

सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 17 वा वर्धापनदिन होणार जल्लोषात साजरा

विविध उपक्रमांचे आयोजन; गरजूंना देण्यात येणार मदतीचा हात

सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 17 वा वर्धापनदिन होणार जल्लोषात साजरा होणार असून यादिवशी विविध उपक्रमांचे मनसे पदाधिकारी- कार्यकर्त्यांनी आयोजन केले असल्याची माहिती मनसे चे जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांनी दिली. दरम्यान, याच दिवशी गरजूंना खाद्यपदार्थांचे वाटपही करण्यात येणार आहे.

सातारा : सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 17 वा वर्धापनदिन होणार जल्लोषात साजरा होणार असून यादिवशी विविध उपक्रमांचे मनसे पदाधिकारी- कार्यकर्त्यांनी आयोजन केले असल्याची माहिती मनसे चे जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांनी दिली. दरम्यान, याच दिवशी गरजूंना खाद्यपदार्थांचे वाटपही करण्यात येणार आहे.
सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 17 वा वर्धापनदिन जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या साथीने जल्लोषात साजरा होणार आहे. विविध सामाजिक उपक्रमांचेही यावेळी आयोजन करण्यात आले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी, वृक्षारोपण, रक्तदान यांसारख्या विविध समाजोपयोगी उपक्रमातून मनसैनिक आपली मनसे प्रती असलेली निष्ठा दाखवणार आहेत. याचबरोबर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी खाद्यपदार्थांचेही आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी उपक्रमही राबविण्यात येणार असल्याची माहिती युवराज पवार यांनी दिली.