maharashtra

माने कॉलनी येथून दुचाकीची चोरी


माने कॉलनी येथून दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

सातारा : माने कॉलनी येथून दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 24 ते 25 जानेवारी दरम्यान माने कॉलनी, देगाव रोड, नवीन एमआयडीसी, कोडोली, तालुका सातारा येथे घराच्या गेट समोर लावलेली संकेत सुनीलकुमार माने वय 26 यांच्या मालकीची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक एमएच 11 एएच 1116 ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून अधिक तपास महिला पोलीस नाईक शिंदे करीत आहेत.