सिव्हिलसह विविध प्रश्नांवर सार्वजनिक बांधकाम विभागाची ठाकरे गटाने घेतली भेट
अभियंता श्रीपाद जाधव यांनी दिले आश्वासन
क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण येथे जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातील वाड्यावस्तीवरून रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र, या रुग्णालयात भौतिक सुविधाची वाणवा आहे.
सातारा : येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात अनेक भौतिक सुविधा नाहीत. त्यामुळे रुग्णालयात रुग्णांना गैरसुविधा निर्माण होत आहे. सुविधा देण्यासाठी जो निधी मंजूर आहे. त्या निधीतून काम तत्काळ सुरू करावे, अन्यथा आम्हाला शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव यांना ठाकरे गटाच्यावतीने देण्यात आला आहे. दरम्यान, जाधव यांनी कामे चांगल्या दर्जाची केली जातील, असे आश्वासन दिले.
यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, शहर संघटक प्रणव सावंत, युवा सेना शहर प्रमुख शिवेंद्र ताटे, उपशहर प्रमुख शिवाजीराव इंगवले, गणेश अहिवळे, अमोल गोसावी, सादिक बागवान, आझाद शेख, विभाग प्रमुख सुमीत नाईक, सुनील भोसले, शाखा प्रमुख विनायक शिंदे, नितीन लकेरी, विनायक शिंदे, योगेश शेलार, ऋषिकेश साठे, सिद्धार्थ कांबळे, उपविभाग प्रमुख रजत नाईक, आशुतोष पारंगे, राजू नाईक, हेंमत उबाळे, सागर साळुंखे, सचिन शिंदे, सुनील पवार, अनिल गुजर, शिवसेना महिला संघटिका सौ. मंजिरी सावंत आदी उपस्थित होते.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण येथे जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातील वाड्यावस्तीवरून रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र, या रुग्णालयात भौतिक सुविधाची वाणवा आहे. जिल्हा रुग्णालयात जसे टापटीप स्वच्छ हवे असते तसे पहायला मिळतं नाही. रुग्णालयाची संरक्षक भिंत पडलेली आहे. नव्याने रंग काम होणे अपेक्षित आहे. काही ठिकाणी बांधकाम करणे अपेक्षित आहे ते तसेच आहे. जो मंजूर निधी आहे त्या निधीतुन कामे तत्काळ करून मार्गी लावावीत, सीसीटीव्ही यंत्रणा पूर्ण क्षमतेने बसवावी, त्याच बरोबर आपल्याकडे ग्रेड सेपरेटर होता तेव्हा लक्ष ठेवले जात होते आता ग्रेड सेपरेटर मध्ये खड्डे पडले आहेत, अपघात होण्याची भीती आहे. त्यावर आपणाकडून पाहणी करून पालिका प्रशासनाला योग्य सूचना देण्यात याव्यात अन्यथा आम्ही ठाकरे गटाच्यावतीने आंदोलन छेडू, असा इशारा दिला आहे.
दरम्यान, अभियंता श्रीपाद जाधव यांनी काम चांगल्या दर्जाचे आणि वेळेत पूर्ण होईल, अशी ग्वाही दिली.


