येथील औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या पर्ल हॉटेलच्या पाठीमागे लावलेल्या ट्रकमधुन अज्ञात चोरट्याने ३७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : येथील औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या पर्ल हॉटेलच्या पाठीमागे लावलेल्या ट्रकमधुन अज्ञात चोरट्याने ३७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ७ ते आठ ऑगस्ट दरम्यान सातारा येथील औद्योगिक वसाहती मध्ये असणाऱ्या पर्ल हॉटेलच्या पाठीमागे मोकळ्या जागेत लावलेल्या ट्रक क्रमांक एम.एच.११ एएल ३१३४ मधील दोन बॅटऱ्या, १२० लिटर डिझेल तसेच संबंधित ट्रकच्या शेजारी लावलेल्या आणखी एका ट्रक मधील डिझेल असा एकूण ३७ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेण्याची तक्रार हनुमंत आप्पा जरग, रा. समर्थ नगर, औद्योगिक वसाहत, सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.


