पाटण येथे बेवारस मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पाटण : पाटण येथे बेवारस मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, काल दि. 11 रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पाटण गावच्या जुना एसटी स्टँड येथील करीम शेख यांच्या मटन शॉप च्या शेजारी अज्ञात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला आहे. याबाबतची फिर्याद सागर दादासो पोतदार वय 35 यांनी पाटण पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.


