पत्नीला पोटगी न दिल्याने एकास न्यायालयाने सहा महिन्यांच्या कैदेची शिक्षा सुनावली आहे.
सातारा : पत्नीला पोटगी न दिल्याने एकास न्यायालयाने सहा महिन्यांच्या कैदेची शिक्षा सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा येथील कौटुंबिक न्यायालयात एक दावा दाखल होता. या दाव्याच्या निकालात संबंधित महिलेस दरमहा पोटगी देण्याचे आदेश न्यायालयाने तिच्या पतीस दिले होते. आदेश देऊनही पतीने पोटगीची रक्कम न दिल्याने त्याबाबत महिलेने न्यायालयात दाद मागितली. या सुनावणीसाठी हजर राहण्याच्या सूचना करूनही महिलेचा पती सुनावणीस हजर राहिला नाही. यानंतर पोलिसांमार्फत त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. पोटगीस नकार दिल्याने न्यायालयाने त्याला सहा महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली. महिलेच्या वतीने ऍड. रणजित आणि ऍड. धनंजय शंकरराव चव्हाण यांनी काम पाहिले. ॲड. कोमल सावंत यांनी याकामी सहकार्य केले.


