जळणाचे बीडे ठेवण्याच्या कारणातून एका कुटुंबाने दुसऱ्या कुटुंबावर हल्ला केला. ही घटना क्षेत्रमाहुली ता. सातारा येथे दि. २६ रोजी घडली. या प्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : जळणाचे बीडे ठेवण्याच्या कारणातून एका कुटुंबाने दुसऱ्या कुटुंबावर हल्ला केला. ही घटना क्षेत्रमाहुली ता. सातारा येथे दि. २६ रोजी घडली. या प्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सातारा शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सायली ऋतुराज गायकवाड, रा. क्षेत्रमाहुली यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, दि.२६ रोजी ९.३० वाजण्याच्या सुमारास क्षेत्रमाहुली येथे त्यांचे चुलत सासरे राजेंद्र गायकवाड व पती ऋतुराज गायकवाड हे घराच्या बाहेरील बाजूस रस्त्याच्या कडेला तोडलेले जळण व्यवस्थित ठेवत असताना चुलत सासरे अविनाश हणमंत गायकवाड , हणमंत गायकवाड, जयश्री गायकवाड, सेजल गायकवाड, सिद्धी गायकवाड, सई गायकवाड यांनी गर्दी करून मारहाण केली.


