अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकास सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे.
सातारा : अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकास सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 जानेवारी रोजी अडीच वाजण्याच्या सुमारास खेड, तालुका सातारा गावच्या हद्दीतील आयकॉन प्राईड नावाच्या इमारतीच्या आडोशास अविनाश राजाराम भिसे वय 28, रा. प्रतापसिंह नगर सातारा हा संशयितरित्या स्वतःचा चेहरा लपवून अपराध करण्याच्या उद्देशाने बसलेला रात्रगस्तीच्या पोलिसांना निदर्शनास आला. त्याच्याविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक मोहिते करीत आहेत.


