maharashtra

सातारा शहरात सात लाखांची घरफोडी


सातारा शहरात अज्ञात चोरट्याने सात लाखांची घरफोडी केली असून या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.

सातारा : सातारा शहरात अज्ञात चोरट्याने सात लाखांची घरफोडी केली असून या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 10 ते 11 डिसेंबर दरम्यान कोडोली येथील यशवंत कॉलनी मधील सौ. विमल बाबुराव माने यांचा फ्लॅट अज्ञात चोरट्याने फोडून फ्लॅटमधून 7 लाख 10 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने त्यामध्ये मोठ्या मन्यांची मोहन माळ, एक चेन, हातातील ब्रेसलेट, तीन वेढणी, एक नेकलेस, हातातील दोन बांगड्या, एक गंठण, कानातील फुले वेल व रोख तीस हजार रुपये लंपास केले आहेत. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक डी. डी. मुसळे करीत आहेत.