maharashtra

कारची काच फोडून ५० हजार रुपयांची चोरी


वर्ये, ता. सातारा गावच्या हद्दीत एका हॉटेलच्या पार्किंग मध्ये लावलेल्या होंडा कंपनीच्या कारची काच फोडून अज्ञात चोरट्याने ५० हजार रुपये रोख रक्कम, व्हीआयपी ब्रीफकेस व साडेचारशे रुपये रोख रक्कम, आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन चोरून नेल्याची तक्रार तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : वर्ये, ता. सातारा गावच्या हद्दीत एका हॉटेलच्या पार्किंग मध्ये लावलेल्या होंडा कंपनीच्या कारची काच फोडून अज्ञात चोरट्याने ५० हजार रुपये रोख रक्कम, व्हीआयपी ब्रीफकेस व साडेचारशे रुपये रोख रक्कम, आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन चोरून नेल्याची तक्रार तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.१८ नोव्हेंबर रोजी साडेतीन वाजण्याच्या सुमारास वर्ये गावच्या हद्दीत पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मानस जत्रा या हॉटेलच्या पार्किंग मध्ये पार्किंग केलेली होंडा कंपनीची कार क्रमांक जीए. ०५- डी ७२९२ ची अज्ञात चोरट्याने काच फोडून ५० हजार रुपये रोख रक्कम, व्हीआयपी  ब्रीफकेस व साडेचारशे रुपये रोख रक्कम, आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन चोरून नेल्याची तक्रार तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.