maharashtra

मोटर सायकल चोरीतील आरोपीस अवघ्या 1 तासांत अटक

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

सदरबझार येथून चोरी केलेल्या मोटर सायकल चोरटय़ास अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. चोरीचा गुन्हा दाखल होताच अवघ्या एक तासात या आरोपीला जेरबंद केले आहे.

सातारा : सदरबझार येथून चोरी केलेल्या मोटर सायकल चोरटय़ास अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. चोरीचा गुन्हा दाखल होताच अवघ्या एक तासात या आरोपीला जेरबंद केले आहे.
संजय कोंडीबा ढेबे (वय 32, रा. मानरी-मुरा ता. जावली) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सदरबाझार येथील कुपर कॉलनीतील क्षत्रिय कॉम्पलेक्स च्या पार्किंगमधून ऍक्टीवा (क्रं. एमएच 11 सीएन 3834) मोटर सायकल चोरीला गेली. यांची तक्रार शुक्रवार दि. 15 रोजी शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली. तोच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून पाहणी केली. यावेळी संजय ढेबे हा ऍक्टीवा गाडीची नंबरप्लेट वाकवून संशयास्पदरित्या दुधसंघाजवळ आडोश्याला उभा होता. हे पाहून पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर त्याने ही ऍक्टीव्हा गाडी कपूर कॉलनी येथील क्षत्रिय कॉम्प्लेक्स मधून चोरी केल्याची कबुली दिली.
या कारवाईत पोलीस हवालदार मुनीर मुल्ला, पोलीस नाईक, अजित कर्णे, शिवाजी भिसे, विक्रम पिसाळ, पोलीस कॉन्टेबल स्वप्नील दौंड यांनी सहभाग घेतला.