maharashtra

ढाब्यावर काम करणाऱ्या महिलेवर तिथेच काम करणाऱ्याने केला अत्याचार


A woman working on a dhaba was tortured by a person working there
माण तालुक्यातील एका ढाब्यावर काम करणाऱ्या महिलेवर तेथेच काम करणाऱ्या बिहारी कामगाराने अत्याचार केला. ही तक्रार संबंधित महिलेने दहिवडी पोलीस ठाण्यात दिली. आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

दहिवडी : माण तालुक्यातील एका ढाब्यावर काम करणाऱ्या महिलेवर तेथेच काम करणाऱ्या बिहारी कामगाराने अत्याचार केला. ही तक्रार संबंधित महिलेने दहिवडी पोलीस ठाण्यात दिली. आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दोन दिवसांपूर्वी ढाब्यावरील दुपारचे काम संपवून सर्व कामगार विश्रांतीसाठी आपापल्या खोलीत गेले होते. त्यानंतर संबंधित महिलाही फॅमिली रूममध्ये गेल्या. संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कामगार हकसाहेब मंडल याने खोलीत जाऊन हात धरला. ओरडलीस तर मारून टाकेन, असे म्हणत दम दिला. त्यावेळी त्यांनी ओरडण्याचा प्रयत्न केला परंतु दुपारच्या सुटीमुळे आसपास कोणी नव्हते. याचा गैरफायदा घेत अत्याचार केला. त्यानंतर घडलेली घटना पती न्यायला आल्यावर त्यांना सांगितली. त्यानंतर तेथे आमचे नातेवाईक आल्यावर आम्ही दहिवडी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून संबंधित आरोपीला अटक केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश देशमुख तपास करत आहेत.