जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या दोन घटनांमध्ये दोघेजण बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
सातारा : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या दोन घटनांमध्ये दोघेजण बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
दि. 16 रोजी दीड वाजण्याच्या सुमारास रहिमतपुर येथील राहत्या घरातून तेथीलच स्वप्निल शांताराम माने, वय 35 हा राहत्या घरातून शेतात जातो असे सांगून निघून गेला तो अद्याप परत न आल्याची तक्रार शांताराम कोंडीराम माने यांनी रहिमतपूर पोलीस ठाण्यात दिली आहे.
दुसर्या घटनेत, दि. 27 मार्च रोजी अडीच वाजण्याच्या सुमारास पाटखळ येथून बळीराम लक्ष्मण राठोड, वय 53, मूळ रा. बाबळगाव, ता. पाथरी, जि. परभणी हे कोणासाठी काहीही न सांगता निघून गेले आहेत ते अद्याप परत आले नसल्याची तक्रार वैजनाथ बळीराम राठोड यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.


