maharashtra

हॉटेलचालकास मारहाण


सैदापूर ता. सातारा येथे एका हॉटेलचालकास डोक्यात दगड मारुन जखमी केले. याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा : सैदापूर ता. सातारा येथे एका हॉटेलचालकास डोक्यात दगड मारुन जखमी केले. याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ४ रोजी रात्री ही घटना घडली आहे. सैदापूर येथील हॉटेल शिवशक्तीचे मालक विनोद लक्ष्मण पवार वय ४५, रा. सैदापूर हे हॉटेल बंद करत होते. त्यावेळी तिथे दोघेजण आले. त्यांनी येथे कोण मुले आली होती का, अशी विचारणा केली. येथे कोणीही आले नाही असे सांगितल्यावर सागर दिलीप उंबरकर व त्यांचा भाऊ (नाव माहिती नाही, दोघे रा. सैदापूर, ता. सातारा) यांनी विनोद पवार यांच्या डोक्यात दगड मारला. या घटनेत पवार जखमी झाली असून पोलिसांनी सागर उबंकर व त्याच्या भावावर गुन्हा दाखल केलेला आहे. अद्याप त्यांना अटक झालेली नाही. याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार माने करत आहेत.