एकास मारहाण केल्याप्रकरणी सहाजणांवर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी सहाजणांवर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 23 जुलै रोजी सकाळी नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या सुमारास बिजवडी येथील लिंब खोरे येथे असलेल्या सह्याद्री गार्डन या हॉटेलचे मालक रुपेश तुकाराम भोसले वय 35 राहणार बिजवडी, तालुका माण हे आपल्या हॉटेलवर आले असता जुन्या भांडणाच्या कारणावरून विकास गणपत पवार लालासो गणपती पवार गिरीश नामदेव भोसले नामदेव नाना भोसले किरण काशिनाथ गायकवाड व एक अनोळखी इसम हे तेथे येऊन त्यांनी रुपेश भोसले यांना तलवार, लोखंडी रोड, केबल सारख्या वायरने जबर मारहाण केली. यामध्ये रुपेश भोसले जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पो.ना. आर. पी. खाडे करीत आहेत.


