maharashtra

गळफास घेवून एकाची आत्महत्या


गळफास घेवून एकाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सातारा : गळफास घेवून एकाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नेले ता.सातारा येथे अनिल किसन जाधव (वय 45, रा. नेले) यांनी झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना दि. 16 नोव्हेबर रोजी घडली आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.