साहित्य - नाचणी पीठ, मीठ, पाणी, लसूण पाकळ्या (आवडीनुसार), ताक.
कृती ः 1. रात्री चमचाभर नाचणीचे पीठ थोड्याशा पाण्यात/ताकात भिजवावे. 2. सकाळी आधणात मीठ, भिजवलेले पीठ हळूहळू ओतत, एकसारखे ढवळत शिजवून घ्यावे. 3. आच बंद करून लसूण तसाच ठेचून किंवा तेलावर परतून घालावा.
4. थंड झाल्यावर ताक घालून आंबील प्यावी.