maharashtra

खड्डयात दुचाकी आदळून एक जखमी


One injured when his bike collided with a ditch
खिंडवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत खड्डयात दुचाकी आदळून झालेल्या अपघातात एकजण जखमी झाल्याची घटना घडली.

सातारा : खिंडवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत खड्डयात दुचाकी आदळून झालेल्या अपघातात एकजण जखमी झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्वप्निल सत्यवान भोसले, वय १९, रा. खिंडवाडी, ता. सातारा हा दुचाकीवरून सेवा रस्त्यावरून शिवराज पेट्रोल पंप येथून खिंडवाडीकडे जात असताना खिंडवाडी गावच्या हद्दीत रस्त्यावर पडलेल्या खड्डयात दुचाकी आदळून झालेल्या अपघातात जखमी झाला. त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.