maharashtra

आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा


A case of financial fraud
मोबाइल कंपनीच्या सर्विसिंग सेंटरमधील स्पेअर पार्ट विकून 6 लाख 18 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : मोबाइल कंपनीच्या सर्विसिंग सेंटरमधील स्पेअर पार्ट विकून 6 लाख 18 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, डिसेंबर 2021 ते 28 एप्रिल 2022 दरम्यान अमित अशोक महापुरे, वय 31, रा. वडुज, ता. खटाव यांनी सातारा येथील राधिका रोडवर असणार्‍या सिटी बिझनेस सेंटरमधील इन लिड इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट कंपनीने दिलेल्या ओपो मोबाइल कंपनीच्या सर्विसिंग सेंटरमधील 6 लाख 18 हजार हजार रुपये किमतीचे स्पेअरपार्ट विकून फसवणूक केल्याची तक्रार अभिषेक घोष रा. हडपसर, पुणे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.