maharashtra

जिल्ह्यात तीन ठिकाणी चोरीच्या घटना


Incidents of theft at three places in the district
जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.

सातारा : जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 30 ऑगस्ट ते 13 ऑक्टोबर दरम्यान महाबळेश्‍वर, ता. महाबळेश्‍वर येथील हॉटेल अनारकली च्या दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये असलेले 5 हजार 200 रुपये किंमतीचे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची तक्रार प्रवीण गणपत कांबळे (रा. वाटंबे, ता. जावली) यांनी महाबळेश्‍वर पोलीस ठाण्यात दिली आहे.
दुसर्‍या घटनेत दि. 18 ऑक्टोबर रोजी किन्हई गावात असणार्‍या पठ्ठ्या नावाच्या शिवारातून तीन एचपी शक्तीची विद्युत मोटर अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची तक्रार विठ्ठल व्यंकटराव भोसले यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.
तिसर्‍या घटनेत दि. 8 सप्टेंबर रोजी गोपूज, ता. खटाव गावच्या हद्दीत जाधवमळा नावाच्या शिवारात असलेल्या गोठ्यातून संतोष नवनाथ बडे (रा. येळी, जि. अहमदनगर) या नोकराने चांदीचे दोन ग्लास, फायर फॉक्स कंपनीची सायकल, सिलेंडरची टाकी, दोन क्विंटल गहू, 40 किलो हरभरा असा एकूण 34 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेल्याची तक्रार अशोक निवृत्ती खाडे (रा. गोपूज) यांनी औंध पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.