उंदीर मारण्याचे औषध खाल्ल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : उंदीर मारण्याचे औषध खाल्ल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संभाजी बजाबा चव्हाण राहणार करंजे पेठ सातारा यांनी त्यांच्या राहत्या घरी उंदीर मारण्याचे औषध खाल्ले होते. चव्हाण यांचा मुलगा दीपक यांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करून रात्री उशिरा डिस्चार्ज घेऊन खाजगी रुग्णालयात उपचारात घेऊन जात असताना चव्हाण यांची हालचाल बंद झाल्याने पुन्हा जिल्हा रुग्णालयात आणले असता उपचारापूर्वीच चव्हाण यांचा मृत्यू झाल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक बोराटे करीत आहेत.


