maharashtra

फलटण शहरात घरफोडी; ४ लाख १२ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरीस


फलटण, ता. फलटण येथील मंगळवार पेठेतून अज्ञात चोरट्याने घरफोडी करून ४ लाख १२ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. यामध्ये रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे.

सातारा : फलटण, ता. फलटण येथील मंगळवार पेठेतून अज्ञात चोरट्याने घरफोडी करून ४ लाख १२ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. यामध्ये रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १९ ते दि. २० डिसेंबर २०२२ दरम्यान फलटण येथील मंगळवार पेठेत असणाऱ्या अण्णाभाऊ साठे समाज मंदिराच्या पाठीमागे वास्तव्य करणाऱ्या मुबीन आदम कुरेशी यांच्या राहत्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला. आतील ३ हजार रुपये व १ लाख १२ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे नेकलेस, सोन्याचे वेल व झुमके चोरून नेल्याची तक्रार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.