किरकोळ कारणावरून जाशी, तालुका माण येथील महिलेला चौघांनी संगनमत करून खोऱ्याच्या दांड्याने मारहाण केल्याची घटना घडली असून याप्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सातारा : किरकोळ कारणावरून जाशी, तालुका माण येथील महिलेला चौघांनी संगनमत करून खोऱ्याच्या दांड्याने मारहाण केल्याची घटना घडली असून याप्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याप्रकरणी संबंधित उषा अरुण गलांडे वय 40 राहणार जाशी तालुका माण यांनी फिर्याद दिली आहे. धीरज अशोक गलांडे, संपत उत्तम गलांडे, सुजित संपत गलांडे व अशोक उत्तम गलांडे यांच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार फिर्यादी उषा गलांडे यांना अशोक गलांडे यांनी खोऱ्याच्या दांड्याने पाठीत मारहाण केली व फिर्यादीचे पती अरुण दादा गलांडे यांना सुजित गलांडे यांनी अंगावर बसून डावा पाय पीरगळला व हाताने मारहाण केली. याप्रकरणी हवालदार वावरे अधिक तपास करत आहेत.


