लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
सातारा : लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा तालुका परिसरात राहणाऱ्या एका युवतीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी मयूर शरद घागरे राहणार आकले, ता. सातारा याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक फरांदे करीत आहेत.


