maharashtra

राजापूर फाटा येथे दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या पाच जणांना अटक


Five arrested in Rajapur Fata
बुध, ता. खटाव गावच्या हद्दीत राजापूर फाटा येथे दरोड्याच्या हद्दीत असणार्‍या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

सातारा : बुध, ता. खटाव गावच्या हद्दीत राजापूर फाटा येथे दरोड्याच्या हद्दीत असणार्‍या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ६ रोजी ८ वाजण्याच्या सुमारास बुध, ता. खटाव गावच्या हद्दीत राजापूर फाटा येथे विक्रम तुकाराम आगवणे रा. निंभोरे, ता. फलटण, रवींद्र भरत शिरतोडे रा. बोरखळ, ता. सातारा, दीपक शंकर मदने रा. गुरसाळे, ता. माळशिरस, जि. सोलापूर, आदित्य लाला जाधव रा. ठाकुरकी, ता. फलटण आणि राजेश बापूराव पाटोळे ( पत्ता समजू शकला नाही) हे सर्वजण दरोडा घालण्याच्या उद्देशाने शस्त्र दुचाकी व मोबाइल्स घेऊन आढळून आले. यांच्याकडे विचारणा केली असता समाधानकारक स्पष्टीकरण देता न आल्याने त्यांच्या विरोधात पुसेगाव पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पाचही जणांना अटक करण्यात आली आहे.