maharashtra

फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा


Crime against one for cheating
एकाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : एकाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
इनोव्हा कार भाड्याने घेवून गेल्यानंतर ती कार व भाड्याचे पैसे न देता फसवणूक केल्याप्रकरणी अभिजीत पांडूरंग चव्हाण (रा.धावडी, कोंडवा, पुणे) याच्याविरुध्द शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी असिफ मुसा आतार (वय 36, रा. भवानी पेठ, सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.