maharashtra

अत्याचार करून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा


अत्याचार करून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : अत्याचार करून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी जुलै 2020 ते सहा नोव्हेंबर 2022 दरम्यान राजगुरुनगर पुणे येथील महिलेस प्रशांत प्रताप जाधव राहणार मोळाचा ओढा, सातारा याने संबंधित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यानंतर संबंधित महिलेकडून वाळूच्या लिलावासाठी 4 लाख 40 हजार रुपये महिन्याला एक लाख रुपये परत देण्याच्या बोलीवर घेतले. मात्र त्यानंतर त्याने फक्त 30 हजार रुपये परत करून संबंधित महिलेची 4 लाख 10 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. पैशाबाबत त्या महिलेने विचारणा केली असता त्याने त्या महिलेस शिवीगाळ, दमदाटी करत हाताने मारहाण केली. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मोटे करीत आहेत.