maharashtra

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा


A case against one for molesting a woman
रहिमतपूर तालुका कोरेगाव च्या हद्दीत महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा : रहिमतपूर तालुका कोरेगाव च्या हद्दीत महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 21 जुलै रोजी नऊ वाजता रहिमतपूर, ता. कोरेगाव च्या हद्दीत आदिती पेट्रोल पंपाच्या जवळून एक महिला निघाली असता राजू (पूर्ण नाव माहिती नाही) राहणार गोडसेवाडी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा याने संबंधित महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. याप्रकरणी रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पी. व्ही. सावंत करीत आहेत.