maharashtra

कृष्णा नदीच्या पात्रात वृद्धाचा मृतदेह आढळला


नांदगाव तालुका सातारा येथील नाहीर नावाच्या शिवारात लगत असणाऱ्या कृष्णा नदीच्या पात्रात 55 वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळून आला आहे. मधुकर महादेव जाधव राहणार नांदगाव असे मयताचे नाव आहे.

सातारा : नांदगाव तालुका सातारा येथील नाहीर नावाच्या शिवारात लगत असणाऱ्या कृष्णा नदीच्या पात्रात 55 वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळून आला आहे. मधुकर महादेव जाधव राहणार नांदगाव असे मयताचे नाव आहे.

यासंदर्भात कृष्णात महादेव जाधव यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता कृष्णा नदीच्या पात्रात मधुकर यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. सीआरपीसी 174 प्रमाणे घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलीस हवालदार माने अधिक तपास करत आहेत.