सातारा जिल्ह्यात 50 ग्रामपंचायती झाल्या बिनविरोध
सरपंच पदाच्या 57 जागांसाठी 146 उमेदवार रिंगणात
सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 133 ग्रामपंचायत पैकी 50 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, तर 18 ग्रामपंचायती अंशतः बिन विरोध झाल्या आहेत. प्रत्यक्ष निवडणूक 64 ग्रामपंचायतीमध्ये लागली असून थेट सरपंचाच्या 57 पदासाठी 146 जन रिंगणात आहेत. 63 गावातील 380 जागांसाठी 817 उमेदवार रिंगणात असल्याचे ग्रामपंचायत विभागातून सांगण्यात आले.
सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 133 ग्रामपंचायत पैकी 50 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, तर 18 ग्रामपंचायती अंशतः बिन विरोध झाल्या आहेत. प्रत्यक्ष निवडणूक 64 ग्रामपंचायतीमध्ये लागली असून थेट सरपंचाच्या 57 पदासाठी 146 जन रिंगणात आहेत. 63 गावातील 380 जागांसाठी 817 उमेदवार रिंगणात असल्याचे ग्रामपंचायत विभागातून सांगण्यात आले.
जिल्ह्यातील 133 ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक तर 169 गावांमध्ये पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी एकूण 352 अर्ज, तर 915 सदस्य पदांसाठी एकूण 1917 अर्ज दाखल झाले. त्यानंतर छाननी प्रक्रियेत सरपंच पदाचे 347, तर सदस्य पदाचे 1903 अर्ध शिल्लक राहिले होते. यानंतर अर्ज माघारीकडे लक्ष लागून राहिले होते. बुधवारी अर्ज माघारीची प्रक्रिया पार पडली. या दिवशी 136 जणांनी सरपंच पदाच्या शर्यतीतून माघार घेतली. सदस्य पदासाठी 521 इच्छुकांनी माघार घेतली. त्यामुळे सरपंच पदासाठी 211, तर सदस्य पदासाठी 1381 अर्ज शिल्लक राहिले.
थेट सरपंच पदासाठी अकरा गावात एकही अर्ज प्राप्त झाला नाही. उर्वरित 122 पैकी 65 ठिकाणी थेट सरपंच बिनविरोध निवडून आले. आता 57 थेट सरपंच पदासाठी 146 जण रिंगणात आहेत. सदस्य पदासाठी 1903 जणांचे अर्ज शिल्लक होते यापैकी 521 जणांनी माघार घेतली, तर 564 सदस्य बिनविरोध आले. त्यामुळे 63 गावातील 380 जागांसाठी 817 उमेदवार रिंगणात आले आहेत.


