maharashtra

राधिका रोडवरील अतिक्रमणे पालिकेने हटविली

तीन हातगाड्या जप्त; पोलिसांचा बंदोबस्त

राधिका रस्त्यावर सुरू असलेला ‘ओपन बार’ पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून बुधवारी ‘क्लोज’ करण्यात आला. उशिरा का होईना पालिकेने मद्यपींचा अड्डा बनलेल्या येथील हातगाड्यांवर धडक कारवाई केल्याने नागरिकांमधूनही समाधान व्यक्त करण्यात आले.

सातारा : राधिका रस्त्यावर सुरू असलेला ‘ओपन बार’ पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून बुधवारी ‘क्लोज’ करण्यात आला. उशिरा का होईना पालिकेने मद्यपींचा अड्डा बनलेल्या येथील हातगाड्यांवर धडक कारवाई केल्याने नागरिकांमधूनही समाधान व्यक्त करण्यात आले.
बसस्थानकाला जोडणारा राधिका रोड नेहमीच गजबलेला असतो. सकाळी या रस्त्यावर भाजी विक्री सुरू असते.  या मार्गावर अनेक खासगी रुग्णालय असून, नोकरदार, विद्यार्थी, महिला याच मार्गावरुन ये-जा करतात.असे असताना एका वाईन शॉपजवळील तीन हातगाड्यांवर गेल्या अनेक महिन्यांपासून ‘ओबन बार’ सुरू होता. मद्यपींची या हाताड्यांवर दिवसभर अक्षरश: रांग लागत होती. या मद्यपींचा पादचाºयांसह महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.
काही सुज्ञ सातारकांनी हा प्रकार पालिका व पोलिस प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. यानंतर मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या सूचनेनुुसार व पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर, पोलिस निरीक्षक संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या अतिक्रमण विभागाने राधिका रस्त्यावरील हातगाड्या हटविण्याची कारवाई हाती घेतली. बुधवारी दुपारी तीन्ही गाड्या जप्त करून मद्यपींचा अड्डा पालिकेकडून उध्वस्त करण्यात आला. उशिरा का होईना ही कारवाई करण्यात आल्याने नागरिकांमधूनही समाधान व्यक्त करण्यात आले. अतिक्रमण विभाग प्रमुख प्रशांत निकम यांच्यासह आठ कर्मचाºयांनी या कारवाईत सहभाग घेतला.