maharashtra

दुचाकी चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना अटक

दोन दुचाकी हस्तगत ; शाहूपुरी पोलिसांची कारवाई

Two bike thieves arrested
दुचाकी चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना अटक करण्यात शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले. त्यांच्याकडून ३२ हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

सातारा : दुचाकी चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना अटक करण्यात शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले. त्यांच्याकडून ३२ हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे शाहरुख नौशाद खान वय २८, रा. सोमवार पेठ, सातारा आणि सद्दाम सत्तार पटेल वय २७, रा. शनिवार पेठ, सातारा अशी आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी सातारा शहरात दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात वाढ होत असल्याने पोलीस अधिक्षक अजय बन्सल यांनी संबंधित पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना केल्या होत्या. दि. ७ फेब्रुवारी २०२२ रोजी शाहुपुरी पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना सातारा येथील सोमवार पेठ येथे राहणाऱ्या एका मुलाकडे लाल रंगाची चोरीची दुचाकी असून ती तो वापरतो असल्याची माहिती मिळाली. त्या दुचाकीवरून तो समर्थ मंदिर परिसरात फिरत असल्याचे पथकाला बातमीदाराडून समजले. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पथकाने समर्थ मंदिर परिसरात सापळा लावला असता मिळालेल्या वर्णाचा मुलगा व त्याच्याकडून दुचाकी हस्तगत करून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने ती दुचाकी त्याच्या शनिवार पेठेतील एका साथीदारांसह सातारा शहरातील राधिका रोड परिसरातून चोरून आणल्याची कबुली दिली. त्यानंतर त्या मुलाच्या साथीदारांचा शोध घेत असताना तो शनिवार पेठेत त्याच्या राहत्या घराच्या परिसरात दुचाकीसह आढळून आला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या जवळील दुचाकी कराड येथून चोरून आणल्याची कबुली दिली. दोघांनाही अटक करून त्यांच्याकडून ३२ हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
या कारवाईत सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव, सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हेडकॉन्स्टेबल हसन तडवी, शैलेश फडतरे, पोलीस नाईक अमित माने, स्वप्नील कुंभार, ओंकार यादव महिला पोलीस नाईक सुवर्ण बोराटे यांनी सहभाग घेतला.