maharashtra

अवैध सावकारी प्रकरणी दोघांवर गुन्हा


Crime against two in illegal moneylending case
अवैध सावकारी प्रकरणी दोघांवर शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : अवैध सावकारी प्रकरणी दोघांवर शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 6 मार्च 2021 रोजी सविता रामदास कांबळे राहणार न्यू कॉलनी, शिरवळ, तालुका खंडाळा याच ठिकाणी राहणार्‍या सोहेल बागवान यांच्याकडून पाच लाख रुपये व्याजाने घेतले होते. यापैकी तीन लाख %5 हजार रुपये सविता कांबळे यांनी फेडले होते. एवढे पैसे फेडू नये सोहेल बागवान हा सविता कांबळे यांना तुमच्याकडे अजून नऊ लाख रुपये येणे बाकी असल्याचे सांगत होता. यानंतर त्याने त्याची मावशी अलमा शौकत बागवान यांनाही सविता कांबळे यांच्या घरी पैशाच्या मागणीसाठी पाठवून दिले. अलमा बागवान यांनी सविता कांबळे यांच्या मुलीस शिवीगाळ केली. तसेच सोहेल बागवान याने सविता कांबळे यांचा मुलगा शुभम कांबळे यालाही शिवीगाळ करून मारहाण केली. याबाबतची फिर्याद शिरवळ पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार ए. बी. बारेला हे करीत आहेत.