maharashtra

फलटणमधील जाधववाडी येथील वाहतुकीत बदल


फलटण लगत मौजे जाधववाडी येथील ओढ्यावर लहान पुल व पोहोच रस्ता बांधकाम करण्यात येणार असल्याने, दि. 24 डिसेंबर 2022 ते 24 एप्रिल 2023 पर्यंत चार महिने या रस्त्यावरील पुलावरुन वाहतुक बंद करण्यात येणार आहे.

सातारा : फलटण लगत मौजे जाधववाडी येथील ओढ्यावर लहान पुल व पोहोच रस्ता बांधकाम करण्यात येणार असल्याने, दि. 24 डिसेंबर 2022 ते 24 एप्रिल 2023 पर्यंत चार महिने या रस्त्यावरील पुलावरुन वाहतुक बंद करण्यात येणार आहे.

बंद काळामध्ये रस्त्यावरील वाहतुक जाधववाडी ओढ्या अलिकडून एक कि.मी. अंतरावरुन साई मंदीर-शुभम रेसीडेन्सी-श्रीमंत शिवाजीराजे इंग्लीश मेडीयम स्कूल अशी बाह्यवळणावरुन वळविण्यात येणार असल्याचे उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, फलटण यांनी कळविले आहे.