सातारा तालुक्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन जण बेपत्ता झाल्याची तक्रार तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : सातारा तालुक्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन जण बेपत्ता झाल्याची तक्रार तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ३० डिसेंबर २०२२ रोजी महागाव, ता.सातारा येथून जयवंत जगन्नाथ चव्हाण, वय ६५ हे राहत्या घरातून निघून गेल्याची तक्रार रणजीत जयवंत चव्हाण यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिली. दुसऱ्या घटनेत लिंबखिंड, ता. सातारा येथून दि. ३ रोजी ३.१५ वाजण्याच्या सुमारास अक्षय रवींद्र काळे, रा. भाकरवाडी, ता. कोरेगाव हे स्टोन क्रेशर येथून बेपत्ता झाल्याची तक्रार नितीन रवींद्र काळे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली.


