ठोसेघर, ता. सातारा येथे सुरू असणाऱ्या दारू अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी ३ हजार ६०० रुपये किमतीच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.
सातारा : ठोसेघर, ता. सातारा येथे सुरू असणाऱ्या दारू अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी ३ हजार ६०० रुपये किमतीच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ठोसेघर येथे सातारा- चाळकेवाडी मार्गावर असणाऱ्या बेडेकर हॉटेलच्या आडोशाला तेथीलच किसन रामचंद्र बेडेकर, वय ६१ याच्याकडून ३ हजार.६०० रुपये किमतीच्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या पोलिसांनी हस्तगत केल्या. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.


