maharashtra

आरळे येथून बोलेरो जीपची चोरी


आरळे, ता. सातारा येथून अज्ञात इसमाने २ लाख ५ हजार रुपये किमतीची बोलेरो जीप चोरून नेल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : आरळे, ता. सातारा येथून अज्ञात इसमाने २ लाख ५ हजार रुपये किमतीची बोलेरो जीप चोरून नेल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १८ सप्टेंबर ते दि. १९ सप्टेंबर दरम्यान आरळे गावच्या हद्दीत राहत्या घरासमोर पार्किंग केलेली २ लाख ५ हजार रुपये किमतीची बोलेरो जीप क्रमांक एम. एच. ११ बीएल ५७५३ अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार पांडुरंग रामचंद्र कदम यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली.