कांदा उत्पादक शेतकर्यांना 3000 रुपये हमीभाव द्या!
राष्ट्रीय समाज पक्षाची प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र मध्ये तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात निवेदन देऊन कांदा उत्पादक शेतकर्यांच्या मालाला हमीभाव देण्याची मागणी करण्यात आली.
सातारा : राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र मध्ये तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात निवेदन देऊन कांदा उत्पादक शेतकर्यांच्या मालाला हमीभाव देण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे सातारा जिल्हा सरचिटणीस डॉ. रमाकांत साठे, लोकसभा अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेश चव्हाण, शिंदे, मंगेश चव्हाण, चमेली पवार, निलेश लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावर्षी बाजारात आलेला लाल कांदा तसेच रब्बी कांद्याचे पीक अद्याप शेतातच असतानाच कांद्याच्या भावात प्रचंड घसरण झालेली असून, शेतकरी प्रचंड तणावाखाली आलेला आहे. परंतु सत्तासंघर्षपलीकडे राज्यकर्त्यांचे शेतकर्यांवर ओढावलेल्या संकटाकडे सपशेल दुर्लक्ष झाले आहे. जगभर कांद्याला चांगली मागणी असताना कांदा निर्यातीला चालना देण्याऐवजी शेतकर्यांना डुबवण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न चालू आहेत.
यावेळी निवेदनात म्हटले आहे की, तात्काळ या गोष्टीकडे माननीय मुख्यमंत्री कृषी मंत्री यांनी लक्ष देऊन किमान प्रतिक्विंटल 1000 रुपये अनुदान द्यावे व यापुढे किमान प्रतिक्विंटल 3000 रुपये हमीभाव देण्यात यावा, कमी दराने खरेदी झालेल्या लाल व रांगडा कांद्याला फरकाचे अनुदान मिळावे, कांदा निर्यातीस तातडीने चालना मिळावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. अन्यथा संपूर्ण महाराष्ट्र राष्ट्रीय समाज पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही देण्यात आला.


