सातारा शहर परिसरातील दोन जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापे मारत कारवाई केली आहे.
सातारा : सातारा शहर परिसरातील दोन जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापे मारत कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविवार पेठ सातारा येथे चिंचेच्या झाडाखाली मनोज नामदेव पवार वय 35, तस्लीम मोहम्मद खान वय 22, रोहन दिनकर नलवडे वय 21, सोहेल आमीन इनामदार वय 29, श्रीनाथ नंदकुमार ढाणे वय 35, सर्वजण रा. रविवार पेठ, सातारा हे जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून १९६० रुपये आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. ही कारवाई सातारा शहर पोलीस ठाणे यांनी केली आहे.
दुसऱ्या घटनेत शहरातील करंजे नाका येथील प्रमिला मंगल कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या पान टपरी च्या पाठीमागील मोकळ्या जागेत दीपक गजानन देशमुख वय 27, राहणार शनिवार पेठ सातारा, अय्याज कादर मुजावर वय 50, रा. करंजे पेठ सातारा, चंद्रमणी धनंजय आगाने रा. गोडोली, सातारा हे जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून 1850 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. ही कारवाई शाहूपुरी पोलीस ठाण्याने केली आहे.


