maharashtra

मुख्यमंत्री साहेब न्याय द्या; सातारच्या वृध्द धरणग्रस्ताचे अर्धनग्न आंदोलन

एका निवृत्त शासकीय अधिकार्‍याने जमिनीवर केला आहे कब्जा

शासनाने धरणग्रस्त म्हणून दिलेली जमीन एका निवृत्त शासकीय अधिकार्‍याने कब्जा केला आहे. ही जमीन परत मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेद्वाराजवळ ज्येष्ठ नागरिकाने अर्धनग्न आंदोलन केले.

सातारा : शासनाने धरणग्रस्त म्हणून दिलेली जमीन एका निवृत्त शासकीय अधिकार्‍याने कब्जा केला आहे. ही जमीन परत मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेद्वाराजवळ ज्येष्ठ नागरिकाने अर्धनग्न आंदोलन केले.

सहदेव रामचंद्र अंबवले वय 84 वर्षे पुनर्वसनग्रस्त असून त्यांना शासनाने 1979 मध्ये कोंडवली (पुनर्वसित) पो. रहिमतपूर, (ता. कोरेगांव) जमीन दिली होती. या जमिनीवर 1992 पासून निवृत्त शासकीय अधिकारी यांनी कब्जा केला आहे. ही जमीन परत मिळावी म्हणून प्रशासनाकडे गेली 30 वर्षे त्यांचा संघर्ष सुरू आहे. आज, सोमवारी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न होऊन आंदोलन केले. यावेळी मुख्यमंत्री साहेब मला न्याय द्या अशी. आर्त साद त्यांनी घातली आहे.