maharashtra

दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सातारा शहरातील तीन जण बेपत्ता


दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सातारा शहरातील तीन जण बेपत्ता झाल्याच्या घटना शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत.

सातारा : दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सातारा शहरातील तीन जण बेपत्ता झाल्याच्या घटना शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 11 डिसेंबर रोजी मतकर कॉलनी मधील विवाहिता आपल्या मुलीला घेऊन राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे.

दुसऱ्या घटनेत मतकर कॉलनी मधील साहिल मुश्ताक मोमीन वय 19 हा राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेला आहे.